Join us

अजय देवगणचा 'हा' सिनेमा येणार अ‍ॅनिमेटेड स्वरुपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:53 IST

अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणचा तडफदार व प्रामाणिक पोलिस अधिकारी सिंघम म्हणून जशी रसिकांमध्ये ओळख आहे. याशिवाय तो विनोदी अंदाजासाठी गोलमाल चित्रपट आवर्जुन नजरेसमोर येतो. गोलमाल फ्रॅंचाईजीने अजयला विनोदी अभिनेता म्हणून प्रस्थापित केले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता हा चित्रपट अ‍ॅनिमेशनच्या स्वरूपात सादर केला आहे. हा अ‍ॅनिमेटेड शो सोनिक या वाहिनीवर लहान मुलांच्या भेटीला येणार आहे आणि या शोचे नाव असणार आहे गोलमाल ज्युनियर.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार गोलमाल ज्युनियर शो दोन खोडकर ग्रुपवर आधारीत असणार आहे. हा शो मे मध्ये मुलांना शाळेला पडलेल्या सुट्टीची वेळ साधून प्रसारीत केला जाणार आहे. यापूर्वी अजयच्या सिंघम चित्रपटावर देखील लिटिल सिंघम नामक अ‍ॅनिमेटेड शो प्रसारीत झाला होता.

अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार असा अंदाज लावला जात आहे.

या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू व रकुल प्रीत सिंग, जिमी शेरगिल व आलोकनाथ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अजय देवगणतब्बू