Join us

‘हिरो’ म्हणून बाद होण्याआधीच अजय देवगणने शोधला दुसरा पर्याय, जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:57 IST

लोक मला काढून बाहेर फेकतील, त्यापूर्वीच मला येथून बाहेर पडायचे आहे,’ असे अजय म्हणाला.

ठळक मुद्देअजय सुमारे तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ रिलीज होतोय. हा अजयचा 100 वा सिनेमा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 10 वर्षांनंतर अजय व काजोलची जोडी रूपेरी पडद्यावर दिसणार असल्यानेही प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण पुढच्या तीन-चार वर्षांनंतर प्रेक्षकांचा हाच उत्साह कायम राहिल, हे कुणी सांगावे? कदाचित म्हणूनच अजयने करिअरसाठी एक दुसरा पर्याय शोधला आहे. होय, खुद्द अजयने याबाबत खुलासा केला.

अजय सुमारे तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. याकाळात अजयने अ‍ॅक्शन ते कॉमेडीपर्यंतचा पल्ला गाठला. अनेक दमदार भूमिका साकारल्या. साहजिकच प्रेक्षकांनी अजयला भरभरून प्रेम दिले. पण भविष्यातही प्रेक्षक अजयला मेनस्ट्रिम हिरो स्वीकारतील, याचा मात्र नेम नाही. अजयला कदाचित ही गोष्ट कळली आहे आणि म्हणूनच त्याची तजवीज त्याने केली आहे.

एका ताज्या मुलाखतीत अजय यावर बोलला. ‘ मी सध्या अ‍ॅक्टिंग आणि प्रॉडक्शन दोन्ही गोष्टी करतोय. कारण येत्या काळात मला निर्माताच बनायचे आहे. कलाकाराचे एक वय असते, हे मला माहित आहे. काही वर्षांनंतर मेनस्ट्रिम हिरोच्या भूमिका मिळणे बंद होईल आणि माझ्यावर कॅरेक्टर रोल करण्याची वेळ येईल, हे मी जाणतो. त्यामुळे आत्तापासूनच मी तयारी सुरु केली आहे. निर्मिती क्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. लाईमलाईटमध्ये राहणे ही नशा आहे. पण म्हणून मी आजन्म हे सगळे उपभोगू शकत नाही. लोक मला काढून बाहेर फेकतील, त्यापूर्वीच मला येथून बाहेर पडायचे आहे,’ असे अजय म्हणाला.

टॅग्स :अजय देवगण