Join us

अजय देवगण संतापला; म्हटले आम्ही ‘पोर्न चित्रपट बनविला नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:17 IST

​अभिनेता अजय देवगण याच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. चित्रपटातील इंटीमेट आणि किसिंग सीन्स सध्या चर्चेत असून, याच विषयावरून अजयला ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्यात विचारण्यात आले.

अभिनेता अजय देवगण याच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. चित्रपटातील इंटीमेट आणि किसिंग सीन्स सध्या चर्चेत असून, याच विषयावरून अजयला ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्यात विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांमुळे तो चांगलाच संतापल्याचे दिसून आले. ‘निर्मात्यांनी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे न पाठविताच त्यातील किसिंग सीन्स का काढले?’ असा जेव्हा अजयला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने संतापात म्हटले की, ‘या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही काही पोर्न चित्रपट बनविला नाही.’ काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, अजय आणि इलियाना डिक्रूज यांच्यात चित्रित करण्यात आलेले किसिंग सीन्स सेन्सॉर बोर्डाकडे न पाठविताच हटविण्यात आले आहेत. ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्यात अजयला याविषयी प्रश्न विचारले जातील याबाबतचा अगोदरच अंदाज व्यक्त केला जात होता. त्याचबरोबर अजय त्यावर काय उत्तर देईल याचादेखील उपस्थिताना अंदाज होता. दरम्यान, अजयला यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीविषयी विचारण्यात आले. अजयला म्हटले की, सद्यस्थितीत निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाला सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बºयाचशा अडचणींचा सामना करावा लागतो, यावर तुझे काय मत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर देताना अजयने म्हटले की, ‘माझ्याबाबत असे कधी घडले नाही. खरं तर मला असे वाटते की, निर्मात्यांनी योग्य पद्धतीने त्यांचे म्हणणे सेन्सॉर समोर मांडल्यास अशाप्रकारच्या अडचणी येणार नाहीत.’असो, अजयचा ‘बादशाहो’ हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथारिया यांनी केले असून, हा एक धमाकेदार अ‍ॅक्शनपट आहे. चित्रपटात अजयसह इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता, इमरान हाशमी आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बादशाहो’ या चित्रपटाची कथा राजस्थानातील एक रॉयल फॅमिलीवरून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. या फॅमिलीचे इमर्जन्सी काळात काही राजकीय नेत्यांशी वैर निर्माण होते. तेथूनच चित्रपटाची कथा पुढे जाते. या परिवाराकडे असलेला गुप्त खजिना योग्य ठिकाणी पोहचविण्याचा थरार या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.