बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत चालत्या ऑटोवर एक कुत्रा रूबाबात उभा दिसतोय. चालत्या ऑटोवर उभा असलेला हा कुत्रा पाहून तुम्हाला कुणाची आठवण येवो ना येवो, पण रितेशला ती आली. कुणाची? तर अजय देवगणची. होय, हा व्हिडिओ पाहून रितेशला अजयच्या ‘फुल और कांटे’ या चित्रपटातील ‘त्या’ आयकॉनिक सीनची आठवण झाली. (तोच तो, ज्यात अजय दोन चालत्या बाईकवर उभा राहून गाणे गातो) मग काय रितेशने या व्हिडिओत अजयला टॅग करत, ‘मी आत्ताच तुझा कुत्रा पाहिला...’, असे लिहिले.
रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’; तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:48 IST
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला.
रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’; तुम्ही पाहिला?
ठळक मुद्दे लवकरच रितेश व अजय देवगण ‘टोटल धमाल’ या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी दीक्षित आणि अर्शद वारसी हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.