'दृश्यम ३' सिनेमा सध्या रिलीजआधीपासूनच चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण ठरलाय तो म्हणजे अक्षय खन्ना. सिनेमाचं शूटिंग सुरु होण्यापूर्वीच अक्षयने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतली आहे. 'दृश्यम २'मध्ये पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारणारा अक्षय तिसऱ्या भागात मात्र दिसणार नाहीये. त्यामुळे निर्माते आणि सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक पाठक चांगलेच नाराज आहेत. अशातच या प्रकरणावर अजय देवगणची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अजय देवगणनेअक्षय खन्नाच्या एक्झिटवर दिली प्रतिक्रियाई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अभिषेक पाठकने याविषयी खुलासा केला. अभिषेक म्हणाला, ''सर्व काही ठरलं होतं आणि अक्षय खन्नाला सिनेमाची स्क्रीप्टही आवडली होती. अक्षय खन्नाचा लूक आणि कपडेपटही ठरला होता. परंतु धुरंधरच्या रिलीजच्या एक दिवस आधी अक्षयने सिनेमा सोडला. याविषयी अजय देवगणशी आमचं बोलणं झालं. तेव्हा तो म्हणाला, काय करायचं ते तुम्ही बघा. तसंही ही गोष्ट निर्माते आणि माझ्यामधली गोष्ट आहे.''
अजय देवगण, तब्बू, श्रिया सारन, रजत कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'दृश्यम ३' सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम ३' हा या फ्रँचायझीचा अखेरचा सिनेमा असेल, अशी शक्यता आहे. अक्षय खन्नाच्या जागी 'दृश्यम ३'मध्ये कोण दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
Web Summary : Ajay Devgn responded to Akshay Khanna's exit from 'Drishyam 3,' stating it was between the producers and director. Director Abhishek Pathak expressed disappointment as Khanna exited just before filming, despite liking the script. The movie is slated for release on October 2, 2026.
Web Summary : अजय देवगन ने अक्षय खन्ना के 'दृश्यम 3' छोड़ने पर कहा कि यह मामला निर्माताओं और निर्देशक के बीच का है। निर्देशक अभिषेक पाठक ने निराशा व्यक्त की क्योंकि खन्ना ने स्क्रिप्ट पसंद आने के बावजूद शूटिंग से ठीक पहले फिल्म छोड़ दी। फिल्म 2 अक्टूबर, 2026 को रिलीज होगी।