भारतीय सिनेमात दिग्दर्शक राजमौली आणि सुपरस्टार अजय देवगणचे नाते बरेच जुने आहे. फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, अजय व काजोलने तामिळ ब्लॉकबस्टर ‘ईगा’ (मक्खी)च्या हिंदी रिमेकला आपला आवाज दिला होता. हा चित्रपट राजमौली यांचा होता. तेव्हापासून राजमौली व अजय देवगण एकमेकांना ओळखतात. कदाचित याच जुन्या दोस्तीखातर राजमौलींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी अजयशी संपर्क साधला होता. ‘ट्रिपल आर’ या चित्रपटात राजमौली अजयला घेऊ इच्छित होते. पण ताजी खबर मानाल तर अजयने राजमौलींची ही आॅफर धुडकावून लावली. अर्थात यामागे कुठली नाराजी नाही तर तारखांची अडचण हे कारण आहे.
अरे देवा, अजय देवगणने नाकारला राजमौलींचा चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 20:00 IST
‘ट्रिपल आर’ या चित्रपटात राजमौली अजयला घेऊ इच्छित होते. पण ताजी खबर मानाल तर अजयने राजमौलींची ही आॅफर धुडकावून लावली.
अरे देवा, अजय देवगणने नाकारला राजमौलींचा चित्रपट!!
ठळक मुद्दे ‘बाहुबली’ दिग्दर्शक राजमौली यांच्या ‘ट्रिपल आर’बद्दल सांगायचे तर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यात साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.