गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात अजय भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारताना दिसेल.मुव्ही क्रिटीक्स तरण आदर्श यांनी काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली. ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धदरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. अभिषेक दुधई द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट गिन्नी खानूजा,वजीर सिंह, भूषण कुमार यांची निर्मिती आहे.
अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:40 IST
गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे.
अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका!
ठळक मुद्दे१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते.