‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावले. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला. शाहरूख खान आणि काजोलचा हा चित्रपट आठवला तरी मूड रोमॅन्टिक होतो. सर्वाधिक काळ चित्रपटगृहात झळकण्याचा विक्रम नावावर असलेला चित्रपट आजही सिनेप्रेमींच्या मनात घर करून बसला आहे. हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, काजोलची ताजी मुलाखत. या मुलाखतीत काजोलने एक आश्चर्यकारक खुलासा केला. होय, काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ हा असा एक चित्रपट आहे, जो तिचा पती अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही.
अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 18:31 IST