Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर 'या' महिन्यांपासून सुरु होणार अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 16:54 IST

अजय चाणक्य आणि तानाजी : द अनसंग वॉरियरमध्ये सुद्धा दिसणार आहे. तानाजीमध्ये अजय तानाजी मालुसरेची भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्दे 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे बजेट 150 कोटींचे आहे. अभिनेत्री म्हणून काजोलच्या नावाची चर्चा आहे

अजय देवगणने नुकतेच अनेक प्रोजेक्ट साईन केले आहेत. त्यात लव रंजनचे दोन सिनेमा आहेत. एकात तो रणबीर कपूरसोबत तर दुसऱ्यात तब्बूसोबत दिसणार आहे. नीरज पांडेच्या सिनेमात अजय फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहिम यांची भूमिका साकारणार आहे.  

याशिवाय अजय चाणक्य आणि 'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये सुद्धा दिसणार आहे. तानाजीमध्ये अजय तानाजी मालुसरेची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. मेगा बजेट सिनेमाची शूटिंग 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अजय देवगण आणि भूषण कुमार याची निर्मिती करणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचे बजेट जवळपास 150 कोटींचे आहे. अभिनेत्रीसाठी काजोलच्या नावाची चर्चा आहे मात्र अजून त्याची घोषणा झालेली नाही. सैफ अली खान यात नेगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे.सैफ राजपूत अधिकारी उदयभान राठोरची भूमिका साकारणार आहे. उदयभान तोच राजपूत अधिकारी आहे ज्याला औरंगजेबने मुगल आर्मीचा चिफ जय सिंगने नियुक्त केले होते 

दिग्दर्शक ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढ्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी सिनेमाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत.  दिग्दर्शक ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य-एक युगपुरूष या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.  

टॅग्स :अजय देवगणकाजोल