अजय देवगण आणि काजोलची लेक निसा लोकप्रिय स्टारकिड आहे. अजय देवगण आणि काजोलसाठी सध्या आनंदाचा क्षण आहे. कारण, त्यांची लाडकी लेक निसा देवगण ग्रॅज्युएट झाली आहे. निसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडीओ समोर आला आहे. लेकीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला अजय देवगण आणि काजोलही गेले होते.
निसा देवगण स्वित्झर्लंडच्या ग्लियन इंस्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन येथे शिक्षण घेत होती. २२ वर्षांची निसा आता ग्रॅज्युएट झाली आहे. त्यामुळे काजोल आणि अजय देवगणसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. निसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये निसा स्टेजवर जाताना "कम ऑन बेबी" असा आवाज ऐकू येत आहे. हा आवाज काजोलचा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत निसादेखील इतर स्टारकिडसारखीच अभिनयात करिअर करेल, असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र निसाने वेगळा मार्ग निवडला. लेकीच्या अभिनयातील पदार्पणावर काजोल म्हणाली होती की "ती आता २२ वर्षांची आहे. मला वाटत नाही की ती आता अभिनयात येईल. करिअर कशात करायचंय हे तिने ठरवलंय असं मला वाटतं".