Join us

अजय देवगण म्हणतोय, काजोलला तू है बीवी नंबर 1

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 13:04 IST

सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशन दरम्यान अजय देवगणने काजोलबाबत अनेक गुपीतं उघडी केली आहेत.

ठळक मुद्दे काजोलच्या तुलनेत मी खूप पैसे खर्च करतो असे अजयचे म्हणणे आहे लवकरच काजोलचा 'हेलीकॉप्टर ईला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशन दरम्यान अजय देवगणनेकाजोलबाबत अनेक गुपीतं उघडी केली आहेत. अजने सांगितले काजोलला जास्त पैसे खर्च करणे आवडत नाही, ती कंजूस आहे. काजोलच्या तुलनेत मी खूप पैसे खर्च करतो असे ही अजय म्हणाला. काजोल शॉपिंगला ही कमी जात असल्याचे तो म्हणाला. मी खूप भाग्यशाली आहे कारण मला काजोलसारखी कमी पैसे खर्च करणारी पत्नी लाभली आहे. अजय पुढे म्हणाला, काजोल न्यासा आणि युग खूप लक्ष देते. 

लवकरच काजोलचा 'हेलीकॉप्टर ईला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा या सिनेमाची निर्मीती करता येणार आहे.  

टॅग्स :अजय देवगणकाजोल