अजय देवगण घेऊन येतोय, ‘आता माझी सटकली’ ! वाचा, एक Most Exciting NEWS !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:29 IST
होय, ‘सिंघम‘ सीरिजमधला अजय देवगणचा सर्वाधिक गाजलेल्या डॉयलॉगसह अजय आपल्या भेटीस येणार आहे.
अजय देवगण घेऊन येतोय, ‘आता माझी सटकली’ ! वाचा, एक Most Exciting NEWS !!
सध्या अजय देवगणचा ‘गोलमान अगेन’ जोरात आहे. यंदाच्या सालात ‘बाहुबली2’नंतर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमान अगेन’ला सर्वाधिक मोठी ओपनिंग मिळाली आहे. खरे सांगायचे तर अजय देवगणही जोरात आहे. होय, अजय एकापाठोपाठ एक सिनेमे करत सुटलाय. अगदी महिनाभरापूर्वी अजयचा ‘बादशाहो’ येऊन गेला. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला. पण ‘गोलमाल’ सीरिजने अजयला पुन्हा यशाच्या मार्गावर आणून सोडले. त्यामुळेच की काय, अजयची गाडी आता सुस्साट निघालीय. ताजी खबर खरी मानाल तर ‘गोलमाल’इतक्याच हिट ठरलेल्या ‘सिंघम’सीरिजच्या प्रेक्षकांच्या मनातील स्मृती अजय जाग्या करणार आहे. होय, ‘सिंघम‘ सीरिजमधला अजय देवगणचा सर्वाधिक गाजलेल्या डॉयलॉगसह अजय आपल्या भेटीस येणार आहे. हा डायलॉग कुठला, हे तर तुम्हाला कळलेच असेल. होय, ‘आता माझी सटकली’ हाच तो डायलॉग. याच नावाचा चित्रपट अजय घेऊन येतो आहे. ‘आता माझी सटकली’ हे अजयच्या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. हा चित्रपट मराठी असेल. रोहित शेट्टी व अजय देवगण या गोडजोडीने मराठी चित्रपटासाठीही हातमिळवणी केली आहे. अजयने खुद्द ही माहिती दिली आहे. ‘अॅक्शन थ्रीलर मराठी चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत. आता माझी सटकली, हे या चित्रपटाचे शीर्षक आहे. रोहितने शीर्षकाची नोंदणीही केली आहे. अर्थात हा चित्रपट रोहित दिग्दर्शित करेल वा नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही. तो प्रयत्नशील आहे. तो किंवा अन्य कुणी दिग्दर्शक हा चित्रपट दिग्दर्शित करेल,’असे अजयने ताज्या मुलाखतीत सांगितले.ALSO READ: अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ने तोडला शाहरूख खानचा रेकॉर्ड!या चित्रपटाची तयारी सुरु झाल्याचेही कळते. म्हणजेच अजयची पत्नी काजोल(काजोलची आई तनुजा मराठी आहे.) हिने त्याला मराठीचे धडे देणे सुरु केले आहे. काजोलचे मानाल तर तिलाही ‘आता माझी सटकली’ हे नाव जाम आवडले आहे. तुम्हाला हे नाव कसे वाटते, ते जरूर कळवा. तूर्तास या चित्रपटाची कथा, अन्य स्टारकास्ट याबद्दल फार माहिती मिळू शकली नाही. पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी चाहत्यांना ‘आता माझी सटकली’ हे नावचं पुरेसे आहे. कारण या नावावरून तशीही एक्ससाईटमेंट वाढली आहे.