Join us

शाहरूख होणार का ऐशचा पती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 10:51 IST

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाच्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या अशी चर्चा सुरू आहे की, शाहरूख ...

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाच्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या अशी चर्चा सुरू आहे की, शाहरूख खान या चित्रपटात ऐश्वर्या रॉयचा पतीची भूमिका साकारणार आहे. तो पाहुण्या कलाकाराच्या रूपात असेल.शाहरूख-करण जोहर यांची टीम आता पुन्हा एकदा ‘कुछ कुछ होता हैं’ च्या दिवसांकडे पुन्हा वळल्याचे वाटतेय. त्यावेळच्या चित्रपटांची टीम आता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या चित्रपटाचा टीजर ३ आॅगस्टला रिलीज होणार आहे.शाहरूख खानची यातील भूमिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शाहरूखचे कॅरेक्टर चित्रपटात मृत्यू पावते. त्याच्या मृत्यूनंतर अ‍ॅश रणबीर कपूरच्या कॅरेक्टरच्या जास्त जवळ जाते. याअगोदर शाहरूखची भूमिका सैफ अली खानला दिली होती. मात्र, त्याच्याकडे वेळ नसल्याने मग ती भूमिका शाहरूखला देण्यात आली.