Join us

ऐश्वर्याचे ‘सरबजीत’मधील फोटो लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 09:19 IST

 ऐश्वर्या रॉय बच्चन ही तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ साठी खुप चर्चेत आहे. सरबजीत सिंगच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून ...

 ऐश्वर्या रॉय बच्चन ही तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ साठी खुप चर्चेत आहे. सरबजीत सिंगच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून त्याला पाकिस्तानी जेलमधून सोडवण्यासाठी त्याची बहीण दलबीर कौर किती प्रयत्न करते? यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.या चित्रपटात ऐश्वर्या दलबीर कौरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात ऐश लाल रंगाच्या सलवार कमीसमध्ये दिसत असून चित्रपटातील एका गाण्यातील एक स्टिल फोटो आहे.रणदीपही एका फोटोत दिसत असून तो अतिशय त्रासात आणि चिडलेल्या चेहºयावरील हावभावात तुरूंगात अडकलेला आहे. चित्रपटात याशिवाय रिचा चढ्ढा आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.