Join us

​ऐश्वर्याचे लिप्स बनले गमतीचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 16:07 IST

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रोज काही नवे व विशेष बघायला मिळते आहे. रेड कार्पेटवर अनवाणी पायांनी चालून हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया ...

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रोज काही नवे व विशेष बघायला मिळते आहे. रेड कार्पेटवर अनवाणी पायांनी चालून हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि आता फेस्टिवलच्या तिसºया दिवशी आपल्या ऐश्वर्या रॉय बच्चन ही सुद्धा सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. बेज कलरच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरली. मात्र तिच्या पर्पल लिपस्टिकने सगळाच घोळ केला. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या बोल्ड लिप शेडची चांगलीच टर उडवली गेली. ‘हॉरर चित्रपटांपासून नाही, ऐश्वर्याच्या लिप्समुळे अधिक भीती वाटतेंय,’असे एका टिष्ट्वटर हँडलवरून एकाने लिहिले. कुणी लिहिले, जणू ऐश्वर्याने रेड कार्पेटवर उतरण्याआधी टोपलीभर जांभळं खाल्ली असावीत. कुणी लिहिले,  ऐश्वर्याने ब्लॅक करेंट आईस्क्रीम खाल्ली असावी. ऐश्वर्याने आपल्या मुलीचे क्रियॉन ओठांवर लावले असावेत, अशा शब्दांतही ऐश्वर्याच्या लिप्सची टर उडवली गेली. आता ऐश्वर्या, ही चूक तुझी की तुझ्या मेकअप आर्टिस्टची, आम्हाला काही ठाऊक नाही...पण खरं सांगायचं तर तू लालचुटूक ओठांमध्येच अधिक उठून दिसतेस...होय ना??