Join us

आईपण मिरवणारी ऐश्वर्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:50 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन हिला आदर्श माता म्हणता येईल. कारण, तिने स्वीकारलेले मातृत्व आणि पालकत्व याबाबत ती अतिशय दक्ष आहे. ...

ऐश्वर्या रॉय बच्चन हिला आदर्श माता म्हणता येईल. कारण, तिने स्वीकारलेले मातृत्व आणि पालकत्व याबाबत ती अतिशय दक्ष आहे. म्हणूनच गर्भवती असताना वाढलेल्या वजनाकडे तिने लक्ष दिले नाही, यापोटी झालेल्या टीकेला भीक घातली नाही. मला आईपण मिरवायचं आहे, जगायचं आहे, माझ्या बाळाला क्षणाक्षणाला मोठे होताना बघायचं आहे..असं ऐश्वर्या भावूक होऊन सांगते.‘यार मेरा सुपरस्टार’ या टीव्ही शोमध्ये ऐश्वर्या भरभरून बोलली. मातृत्व मी जबाबदारीने स्वीकारलयं. कुणीतरी सांभाळ करणारं आहे, म्हणून मी बाळाला जन्म दिलेला नाही. त्याचमुळे आज आराध्याची आई म्हणून जगताना माझ्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. शूटला जाण्यापूर्वी आराध्याला शाळेसाठी तयार करणे आणि तिला शाळेत सोडणे हे मी करतेचं करते. त्यानुसार मी माझ्या कामाचे नियोजन करते. मी आई आहे आणि हे आईपण मला जगायचे आहे. अनुभवायचे आहे. आई म्हणून माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण अन् क्षण मला अनुभवायचा आहे,असे ऐश्वर्या म्हणाली.ऐश्वर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘सरबजीत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होतो आहे.