ऐश्वर्या राय हिचा एकेकाळचा आवडता अभिनेत्याची बिकट अवस्था,म्हणतो आहे कुणी काम देता का काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 14:45 IST
कलाकाराचे पाय कायम जमिनीवर असणे गरजेचे आहे.कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगणे,थोड्याशा यशाने हुरळून जाणे अशा गोष्टी कुणाचाही कधीही घात करु ...
ऐश्वर्या राय हिचा एकेकाळचा आवडता अभिनेत्याची बिकट अवस्था,म्हणतो आहे कुणी काम देता का काम?
कलाकाराचे पाय कायम जमिनीवर असणे गरजेचे आहे.कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगणे,थोड्याशा यशाने हुरळून जाणे अशा गोष्टी कुणाचाही कधीही घात करु शकतात.सामान्यांना तर गोष्टी लागू होतातच मात्र सेलिब्रिटींसाठी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत.कारण आज यशशिखरावर असणा-या सेलिब्रिटींना रसिक कधी जमिनीवर आपटतील याची कुणालाही शाश्वती नाही.त्यामुळे बॉलिवूडमध्ये काही मोजक्या कलाकारांचे पाय जमिनीवर असून ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.मात्र हिच बाब प्रत्येकाला जमते असं नाही.त्यामुळे बिकट परिस्थितीत या कलाकारांची दयनीय अवस्था होते.थोड्याशा यशाने हुरळून गेलेले कलाकार सुरुवाती यशानंतर लगेच गायब होतात.ना त्यांची चर्चा होते ना त्यांना कोणतं काम मिळतं.अशीच काहीशी अवस्था सध्या अभिनेता चंद्रचूड सिंह याची झाली आहे. रुपेरी पडद्यावर रोमँटिक भूमिका किंवा वकीलाच्या भूमिका साकारणारा चंद्रचूड सिंह याची ओळख.'माचिस' या सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवणारा कलाकार म्हणजे चंद्रचूड सिंह. दिसायला स्मार्ट असलेल्या चंद्रचूडला सुरुवातीला चांगल्या चांगल्या भूमिका मिळाल्या. 'तेरे मेरे सपने' या सिनेमातून त्याने 1996 साली रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्याच वर्षी त्याचा माचिस हा सिनेमाही रिलीज झाला होता. चप्पा चप्पा चरखा चले या गाण्यातील चंद्रचूड सिंह आजही रसिकांच्या लक्षात आहे. यानंतर त्याने दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. बॉलीवुडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा चंद्रचूड सिंह या आवडता अभिनेता होता. याची कबुली तिने एका कार्यक्रमात दिली होती. असं सगळं असतानाच अचानक चंद्रचूड सिंह याच्या उभरत्या करियरला अचानक कलाटणी मिळाली.दिग्दर्शकांनी त्याला सिनेमासाठी विचारणा बंद केली. त्याच दरम्यान 2000 साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचूड सिंहला अपघात झाला.या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 15 वर्षे लागले. याच दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला त्याची सगळी कमाई खर्ची करावी लागली.या खर्चामुळे त्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली. त्यामुळेच आता चंद्रचूड सिंहला कोणतंही काम मिळेनासं झालं आहे.सिनेमातील भूमिका तर सोडाच छोट्या पडद्यावरील भूमिकाही त्याला मिळेनाशा झाल्या आहेत.परिणामी चंद्रचूड सिंहची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुणी काम देतं का काम असं म्हणायची वेळ त्याच्यावर आली आहे.(Also Read:ऐश्वर्या राय बच्चन बनणार का सरोगेट मदर?)