Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फन्ने खां'मध्ये दिसणार ऐश्वर्या रायचा हॉट अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:59 IST

'ए दिल है मुश्किल' चित्रपट ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज दिसला होता त्यानंतर पुन्हा एकदा ती हॉट अंदाजात कमबॅक करायला तयार झाली आहे.  

ठळक मुद्दे'फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 2016मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपट ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज दिसला होता त्यानंतर पुन्हा एकदा ती हॉट अंदाजात कमबॅक करायला तयार झाली आहे.  

त्याचे झाले असे की सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत ती 'फन्ने खान'मधील एका गाण्याची रिहर्सल करताना दिसतेय. फिल्मफेयरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे यात ऐश तिच्या अंदाजात गाण्याची प्रॉक्टिस करताना दिसतेय. व्हिडीओला बघून अंदाज लावण्यात येतोय कि पुन्हा एकदा ऐश्वर्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यास तयार झाली. मीडिया रिपोर्टनुसार हे गाणं शूट करण्यास ऐश्वर्या रायने नकार दिला होता. मेकर्सना गाण्याचे शब्द बदलण्यास सांगण्यात आले शब्द बदलल्यानंतर ती हे गाणं गाण्यास तयार झाली. चित्रपटातील ऐश्वर्या आपल्या लुकला घेऊन कोणतीही ताडजोड कारावयची नव्हती म्हणून तिने खास करून स्वतःच्या लुक आणि स्टाईलसाठी मनीष मल्होत्रा ची मदत घेतली.

 

'फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे.  3 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअनिल कपूर