याचे कारण असे की, आमिर खान याचा लहान मुलगा आझाद राव खान आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हे एकाच शाळेत शिकत असल्याचे सर्वानाच माहित आहे. नुकतेच आझाद राव आणि आराध्या बच्चन यांच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनात या बॉलिवुडच्या तगडया कलाकारांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.Aaradhya's annual day performance was so cute! She's certainly got the moves haha! pic.twitter.com/qq4feoQj0P— Bewitching Bachchans (@TasnimaKTastic) January 7, 2017
आपल्या मुलांना स्टेजवर डान्स करताना पाहून आमिर, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ते आपल्या मुलांना प्रेक्षकांमध्ये बसून प्रोत्साहित करत होते. ऐश्वर्या तर मोबाईलवर मुलांचा डान्स व्हिडीओ काढण्यात व्यग्र दिसत आहे. तर दुसरीकडे आमिर ही मुलांना टाळया वाजवून प्रोत्साहित करत आहे. आराध्या आणि आझाद हे धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. या व्हिडिओंमध्ये शाळेच्या अध्यक्ष नीता अंबानी यादेखील सेलिब्रिटी पालकांसह बसलेल्या पाहायला मिळत आहे.Watch how excited Abhishek and Aishwarya get as Aaradhya appears on the stage during the finale pic.twitter.com/bFJZ3vldNM— Bewitching Bachchans (@TasnimaKTastic) January 7, 2017
Aaradhya having fun with her friends, so cute pic.twitter.com/YiCf4YJn0P— Bewitching Bachchans (@TasnimaKTastic) January 7, 2017