Join us
Daily Top 2Weekly Top 5

करवाचौथमुळे ऐश्वर्या रायच्या हातातून निसटला होता हॉलिवूडचा हा प्रसिद्ध सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 13:38 IST

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिंदी चित्रपटातच नव्हे तर हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिंदी चित्रपटातच नव्हे तर हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे.. एशला आणि हॉलिवूड स्टार विल स्मिथला नेहमीच एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा होती, पण तसे होऊ शकले नाही. विल स्मिथने ऐश्वर्याला हिच आणि सेवन पाउंड्स आणि टुनाईट ही कम्स या सिनेमांची ऑफर दिली होती. मात्र यापैकी एकाही सिनेमात ती काम करु शकली नाही कारण तिच्याकडे वेळ नव्हता.

इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार ऐश्वर्याने सेवन पाउंड्स सिनेमा का सोडला याचे कारण समोर आले आहे. ऐर्श्वर्याने 2008मध्ये न्यूज एन्जेसी आईएएनएसला सांगितले की, "अमेरिकेतील माध्यमांनी असे लिहिले होते की चित्रपटासाठी स्मिथला भेटण्याऐवजी मी करवा चौथमुळे भुकेली आहे आणि मुंबईला गेले. हे पूर्णपणे चुकीचे आहे. 'सेव्हन पाउंड्स' ची स्क्रिप्ट दिवाळीनंतर वाचायची होती  आणि तेव्हा आजी (तेजी बच्चन) यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी स्मिथला भेटायला लॉस एन्जिल्स जाऊ शकले नाही. हे चुकीचे आहे का? माझ्यासाठी तर नाही आहे. मी कुटुंबासाठी करिअर मागे सोडू शकतो. "

मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन