Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण बनल्या जगातील ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड वुमेन’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:50 IST

ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण या तिघींच्याही चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जगातील ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड वुमेन’च्या ...

ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण या तिघींच्याही चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जगातील ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड वुमेन’च्या यंदाच्या यादीत या तिघींनी जागा पटकावली आहे. ‘योगोव’ या आंतरराष्ट्रीय मॅगझिनने ३५ देशांतील सुमारे ३७ हजार लोकांच्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर केली आहे. ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड  वुमेन’च्या या यादीत ऐश्वर्याने ११ वे स्थान पटकावले आहे. १२ व्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे तर त्यापाठोपाठ १३ व्या क्रमांकावर दीपिका पादुकोणचे नाव आहे.  या यादीत अँजेलिना जोली, मिशेल ओबामा, ओपरा विनफ्रे सारख्या दिग्गज अमेरिकन महिला असल्याने ही यादी खास ठरते. अँजेलिना  या यादीत सर्वाधिक आघाडीवर आहे. दुसºया क्रमांकावर मिशेल ओबामा तर तिसºया स्थानावर ओपरा विनफ्रे यांनी स्थान पटकावले आहे.ALSO READ : Latest Photoshoot​ : फेरेल विलियमसोबत दिसली ऐश्वर्या राय बच्चन!केवळ ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड वुमेन’चं नाही तर या मॅगझिनने ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड  मेन’ची यादीही जाहीर केलीय. यात पहिल्या स्थानावर बिल गेट्स यांचे नाव आहे. दुसºया क्रमांकावर बराक ओबामा, तिसºया स्थानावर जॅकी चॅन यांनी कब्जा केला आहे. विशेष म्हणजे, ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड  मेन’च्या यादीत बच्चन कुटुंबातील आणखी एका सदस्याचे नाव आहे. होय, अमिताभ यांनी या यादीत नववे स्थान पटकावले आहे. त्यांच्याआधी आठव्या क्रमांकावर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे नाव आहे.अमिताभ यांनी व्यक्त केले आश्चर्य...एका युजरने ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड  वुमेन’ व ‘मोस्ट अ‍ॅडमायर्ड मेन’ची ही यादी अमिताभ बच्चन यांना टॅग करत टिष्ट्वट केली. पण ही यादी पाहून अमिताभ यांनी आश्चर्य व्यक्त केले. खरचं??? असा प्रश्न त्यांनी ही यादी पाहून केला. आता असे का, हे त्यांनाच ठाऊक़