Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायच्या लग्नात सहभागी झाली नव्हती तिची जेठाणी; या गोष्टीची वाटत होती तिला भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 15:52 IST

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नात महानायक अमिताभ बच्चन यांनी इलाहाबादमधील एक डझनपेक्षा अधिक परिवारांना आमंत्रित केले ...

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नात महानायक अमिताभ बच्चन यांनी इलाहाबादमधील एक डझनपेक्षा अधिक परिवारांना आमंत्रित केले होते. यामध्ये एक परिवार त्यांच्या आत्याभावाचादेखील होता. या परिवाराची सून म्हणजेच ऐश्वर्या रायची जेठाणी मात्र या लग्नात सहभागी झाली नव्हती. गेल्या १ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने तिचा ४४वा वाढदिवस सेलिब्रेट केला. यानिमित्त तिच्या जेठाणीसोबत एका प्रसिद्ध वेबसाइटने संवाद साधला असता ही बाब समोर आली. यावेळी ऐश्वर्याच्या जेठाणीने तिच्या लग्नात सहभागी न होण्याचे कारणही स्पष्ट केले.  हरिवंशराय बच्चन यांचे वडील प्रताप नारायण श्रीवास्तव यांनी इलाहाबादमधील कटघर परिसरात एक बंगला बांधला होता. या बंगल्यात कधीकाळी अमिताभ यांची आत्या भगवान देवीचा मुलगा (अमिताभ यांचा आत्याभाऊ) रामचंदर आणि त्यांची पत्नी कुसुमलता राहात होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तिसºया क्रमांकाचा मुलगा अनुप, पत्नी मृदुला व मुलांसोबत राहात आहेत. अनुप आणि मृदुलाने एका वेबसाइटशी बोलताना अनेक खुलासे केले. वास्तविक हा परिवार आजही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मृदुलाने सांगितले की, आम्हाला काका-काकू (अमिताभ बच्चन आणि जया बच्चन) यांच्याकडून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची पत्रिका आली होती. मात्र आमची आर्थिक परिस्थिती पाहता बच्चन परिवार आम्हाला लग्नात ओळखणार की नाही या भीतीमुळे आम्ही लग्नात सहभागी होणे योग्य समजले नाही. अनुप आणि मृदुलाने सांगितले की, आमची मनापासून इच्छा होती की, आम्ही अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नात सहभागी व्हावे. मात्र परिस्थितीमुळे आम्ही लग्नात सहभागी होऊ शकलो नाही, ज्याची खंत आजही आम्हाला जाणवत आहे. मृदुलाने म्हटले की, सासू-सासरे म्हणजेच रामचंदर आणि कुसुमलता यांच्या मृत्यूनंतर बच्चन परिवारासोबतचे आमचे नाते पूर्णपणे तुटले आहेत. जोपर्यंत माझे सासरे जिवंत होते तोपर्यंत बाबूजी (डॉ. हरिवंशराय बच्चन) यांचे पत्र येत होते. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे सर्व बंद झाले.