Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: अरेच्चा! चक्क सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या रायने केला डान्स; पती अभिषेकनेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:22 IST

ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक डान्स व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये हे जोडपे सलमान खानच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकताना दिसत असल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. गेल्या काही काळापासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. मात्र, या सर्व अफवांच्या दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक डान्स व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये हे जोडपे सलमान खानच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकताना दिसत असल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका संगीत सोहळ्यातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक 'सलाम-ए-इश्क' या चित्रपटातील गाण्यावर अतिशय उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. 'सलाम-ए-इश्क' याच सिनेमातील हे गाणं सलमानवरच चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यावर ऐश्वर्या राय मनमुरादपणे थिरकताना दिसली. इतकंच नव्हे यावेळी पती अभिषेकनेही तिला साथ दिली. ऐश्वर्या आणि अभिषेकची केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहते भारावून गेले आहेत.

मुंबईत मुदित अदानी आणि अनन्या दीवानजी यांच्या लग्नाचं सेलिब्रेशन होतं. त्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकने खास डान्स करुन चांगलीच मैफिल लुटली. यावेळी त्यांच्यासह मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानीही थिरकताना दिसल्या. यावेळी एक्स बॉयफ्रेंड सलमानच्या गाण्यावर डान्स करताना पाहून ऐश्वर्याच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या लव्हस्टोरीची आठवण झाली. परंतु सर्वांनी ऐश्वर्या - अभिषेकच्या डान्स परफॉर्मन्सला चांगलीच दाद दिली. एकूणच इंडस्ट्रीत नातं जरी तुटलं तरीही कलाकारांमध्ये असलेला प्रोफेनशलिझम, यातून सिद्ध होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya Rai dances on Salman Khan's song; Abhishek joins in!

Web Summary : Amidst divorce rumors, Aishwarya Rai and Abhishek Bachchan's dance video went viral. The couple danced to Salman Khan's song at a wedding celebration. Nita Ambani also joined them. Fans loved Aishwarya and Abhishek's chemistry.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूड