Join us

ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडच्या माजी विश्वसुंदरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 13:04 IST

हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली.

सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.  ऐश्वर्याच्या बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.  एका बर्थ डे पार्टीतला हा फोटो आहे. तिच्या दोनही फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होतोय. एका फोटोत ऐश्वर्या तिच्या हास्यावरुन तर दुसऱ्या फोटोत डोळ्यांवरुन लगेच ओळखता येते आहे. 

मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले.

तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन