तर ही भूमिका साकारणार ऐश्वर्या राय बच्चन फन्ने खानमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:19 IST
ऐश्वर्या राय बच्चन लवकरच फन्ने खान या तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग दिवाळीनंतर सुरु करणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ...
तर ही भूमिका साकारणार ऐश्वर्या राय बच्चन फन्ने खानमध्ये
ऐश्वर्या राय बच्चन लवकरच फन्ने खान या तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग दिवाळीनंतर सुरु करणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ती चित्रपटाची शूटिंग पूर्णदेखील करणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेजी किया रे असे आहेत. यानंतर दुसऱ्या गाण्यात ऐश्वर्या अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिसऱ्या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशन गाणं असेल. ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांची जोडी जवळपास दोन दशकानंतर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघे 2000मध्ये आलेल्या हमारा दिल आपके पास है आणि 1999 साली सुपरहिट झालेल्या ताल चित्रपटात दिसले होते. या लूकसाठी अनिलला बरीच मेहनत घ्यावी लागली. सलग पाच दिवस १०-१० दहा सलूनमध्ये घालवावे लागलेत. या दहा दिवसांत त्याच्या भूमिकेचा लूक ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेलेत. अनेक तास खर्ची घातल्यानंतर अखेर त्याचा हा लूक फायनल झाला. चित्रपटातील अनिलचा लूक एकदम दमदार आहे. अनिलने या चित्रपटासाठी वजनही कमी केले. यासाठी आपल्या डेली फिटनेस रूटीनमध्ये त्याला काही बदल करावे लागले. यानंतर भूमिकेसाठी लागणाºया शेपमध्ये यायला त्याला चार आठवडे लागले. यात चित्रपटाच्या मेकर्सची इच्छा आहे की राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन काही इंटिमेंट सीन्स शूट करावेत पण ऐश्वर्याने त्यास नाकार दिला आहे. यात ऐश्वर्या आपल्या पेक्षा वयाने दहा वर्ष लहान असलेल्या राजकुमार रावसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ऐश्वर्या आणि राजकुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.ALSO READ : तर या व्यक्तीमुळे मनीषा कोईराला आणि ऐश्वर्या राय बच्चन झाले होते कडक्याचे भांडणफन्ने खान चित्रपटाची निर्मिती राकेश ओम प्रकाश मेहरा करणार आहेत. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. पुढच्या वर्षी 13 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.