Join us

तर ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान दिसले असते संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 13:06 IST

१९९९ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीने सर्वांनाच वेड ...

१९९९ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीने सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. पडद्यावरील जोडीचे आणि पडद्यानमागील जोडीचे सुद्धा सर्वांनी कौतुक केले. पण काही कारणास्तव हे नातं फार वेळ टिकले नाही. त्यानंतर इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे. सलमान खान बॉलिवूडमधला मोस्ट एलिजीबल बॅचलर बनला आणि ऐश्वर्या लग्नकरून बच्चन कुटुंबात सुखाने नांदत आहे.पण तुम्हाला हे माहिती आहे का की संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नाही तर ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान दिसणार होते. होय, तुम्ही बरोबर वाचलात संजय लीला भन्साळी यांनी पद्मावतीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनला विचारले होते. त्यांनी या भूमिकेसाठी कसे बसे ऐश्वर्याला तयार देखील केले होते. मात्र ऐश्वर्याने संजय लीला भन्साळींकडे एक अट घातली. तिची अशी अट होती की सलमान खानला आलाउद्दिन खिल्जीची भूमिका करावी. अशी अट ठेवण्याचे कारण असे की ह्या दोघांचे चित्रपटात एकत्र एकही सिन नव्हते म्हणजे दोघे सामोरासमोर आले नसते.  पण दुर्दैवाने सलमान खानने आलाउद्दिन खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला. त्याला ही भूमिका त्याच्यासाठी परफेक्ट वाटली नाही. त्यांने संजय लीला भन्साळी यांच्याकडे राजा रतन सिंगची भूमिका करण्याची तयारी दर्शवली. जो पद्मावतीची पती होता. मात्र यासाठी ऐश्वर्या तयार नव्हते. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांचे हे स्वप्न तुटले. संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजेच आता अखेर त्यांचे मोठ्या पडद्यावर पद्मावती साकारण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यात पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारते आहे तर आलाउद्दिन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग झळकणार आह तर पद्मावतीच्या पतीची भूमिका शाहिद कपूर साकारतो आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ALSO READ :  Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!