Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या-अभिषेकने केला होता जबरदस्त डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:59 IST

ऐश्वर्या-अभिषेकचा ईशाच्या लग्नातील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या आणि अभिषेक 'गल्ला गुडियां' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

सध्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबनी राधिका मर्चंटसह विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अनंत अंबानी-राधिका यांच्या लग्नाच्या प्री वेडिंगसाठी बॉलिवूडमधीलही अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. ईशा अंबानीच्या लग्नातही बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

अंबानींच्या घरातील लग्नसोहळे हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. अंबानींनी त्यांच्या लाडक्या लेकीचं लग्नही मोठ्या धुमधडाक्यात केलं होतं. ईशा अंबानीच्या लग्नालाही बॉलिवूडसह हॉलिवूड सितारेही अवतरले होते. ईशाच्या लग्नात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनीही हजेरी लावली होती. ऐश्वर्या-अभिषेकचा ईशाच्या लग्नातील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या आणि अभिषेक 'गल्ला गुडियां' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणही नाचताना दिसत आहेत. आता अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. फेसबुकचे मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे झाडून सर्व बडे बडे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तर हॉलिवूडची पॉप स्टार सिंगर रिहानादेखील या सोहळ्यासाठी गुजरातला पोहोचली आहे. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनमुकेश अंबानीईशा अंबानी