Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऐश्वर्या दुसºयांदा होणार आई ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 16:20 IST

होय, ऐश्वर्या दुसºयांदा आई होणार असल्याचा अंदाज सध्या बांधला जात आहे. अर्थात सध्या तरी हा अंदाज आहे. हा अंदाज ...

होय, ऐश्वर्या दुसºयांदा आई होणार असल्याचा अंदाज सध्या बांधला जात आहे. अर्थात सध्या तरी हा अंदाज आहे. हा अंदाज बांधण्याचे कारण, ऐशचे कान्स फेस्टिवलमधील काही फोटो. रेड कार्पेटवरील या फोटोंमध्ये ऐश्वर्याचे पोट सुटलेले दिसत आहे. हा ऐश्वर्याचा बेबी बंप असल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर दिसली. यावेळी तिने कुवैती डिझाइनर अली युनूस याने डिझाईन केलेला गोल्डल कलरफुल लैंथ कैप गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसली. मात्र याच गाऊनमधील फोटोंनी ती दुसºयांदा आई होणार असल्याच्या चर्चेला जोर चढला. आता ऐश खरोखरच दुसºयांदा आई होणार आहे की नाही, हे लवकरच कळेल... २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत विवाह केला होता. या दोघांची पाच वर्षांची मुलगी आहे.