ऐश्वर्या-आशा भोसले भेटल्या न्यूयॉर्कमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 10:43 IST
आराध्यानंतर ऐश्वर्या दुसºयांदा गरोदर असल्याच्या बातम्या मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र, नुकतीच ऐश्वर्या न्यूयॉर्क सिटीत आशा भोसले यांना भेटली. ...
ऐश्वर्या-आशा भोसले भेटल्या न्यूयॉर्कमध्ये !
आराध्यानंतर ऐश्वर्या दुसºयांदा गरोदर असल्याच्या बातम्या मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र, नुकतीच ऐश्वर्या न्यूयॉर्क सिटीत आशा भोसले यांना भेटली. त्या दोघी टाईम्स स्क्वेअर येथे ‘एम अॅण्ड एम ’ स्टोअरमध्ये शॉपिंग करताना दिसल्या.आशा भोसले यांनी टिवट करताना म्हटले आहे की, ‘आम्ही दोघी नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये भेटलो. आम्हाला माहिती नसतांना आम्ही एकत्र भेटलो. खरंतर कधीच आपल्याला एखादी व्यक्ती भेटेल का ? हे माहीत नसते. पण ती अचानक समोर येऊन उभी राहते. ’या फोटोत ऐश्वर्या ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत असून तिच्या चेहºयावर स्मितहास्य आहे. तिने तिच्या समोर पर्स ओढून घेतली असून काहीतरी लपवण्याचा भास ती करत आहे. वेल, तू गरोदर आहेस की नाही? हे तर आम्हाला लवकरच नक्कीच कळेलच.