Join us

ऐशने धुतली भांडी, अन् पुसली फरशीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 21:50 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने नुकतीच अमृतसर येथील गोल्डन टेम्पल येथे मुलगी आराध्या आणि आई वृंदा यांच्यासोबत भेट दिली. दहा ...

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने नुकतीच अमृतसर येथील गोल्डन टेम्पल येथे मुलगी आराध्या आणि आई वृंदा यांच्यासोबत भेट दिली. दहा दिवस अगोदर तिने गोल्डन टेम्पलला भेट दिली होती. ‘सरबजीत’ ची शूटिंग जशी सुरू झाली तशी ती पुन्हा या टेम्पलला भेट देण्यासाठी आली. ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपट ‘सरबजीत’ च्या टीमला पंजाबमधील काही देवस्थाने फिरण्याची संधी मिळाली होती. शूटिंग जशी संपत येऊ लागली तसा सर्वांनाच मंदिरांना, गुरूद्वारांना भेटी देण्याची संधी मिळाली. ऐश्वर्याने अमृतसर येथील हरमंदिर साहिब, गोल्डन टेम्पल येथे शूटिंगसाठी सर्व टीमसह भेट दिली. तिथे तिने भक्तांसाठी लागलेली भांडी धुतली तसेच फरशी पुसली आणि जेवणही बनवले. तिने मंदिराच्या कामगारांकडून सर्व मार्गदर्शन मिळवले. चुका होऊ नयेत म्हणून प्रकर्षाने तिने प्रयत्न केले.