'बॉर्डर २' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. 'बॉर्डर'मधील 'घर कब आओगे' हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. 'बॉर्डर २'मध्ये हे गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याच्या लाँच सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
'बॉर्डर २'मध्ये अहान शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तो 'बॉर्डर'मध्ये शहीद झालेल्या सुनील शेट्टीच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. 'घर कब आओगे' या गाण्याच्या लाँच सोहळ्यात अहान शेट्टीच्या कृतीने सगळेच भारावून गेले आहेत. इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की स्टेजवर सनी देओल आणि वरुण धवन उभे आहेत. त्यानंतर अहान शेट्टी स्टेजवर येतो. स्टेजवर येताच तो सनी देओलच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहते अहान शेट्टीचं कौतुक करत आहेत.
"सुनील शेट्टीसारखाच त्याचा मुलगाही आहे", "संस्कार", "संस्कार त्याच्या वयापेक्षा मोठे आहेत", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान, 'बॉर्डर २'मध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मोना सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २३ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Ahan Shetty touched Sunny Deol's feet at the 'Border 2' song launch. The film, starring Sunny Deol and Ahan Shetty, releases January 23rd. Fans appreciate Shetty's gesture.
Web Summary : 'बॉर्डर 2' के गाने के लॉन्च पर अहान शेट्टी ने सनी देओल के पैर छुए। सनी देओल और अहान शेट्टी अभिनीत फिल्म 23 जनवरी को रिलीज होगी। फैंस शेट्टी के जेस्चर की सराहना करते हैं।