'सैय्यारा' चित्रपटाच्या तुफान यशानंतर अभिनेता अहान पांडे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहानचे चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत होते, अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर अहानसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अली अब्बास जफर यांनी सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है', 'भारत', 'सुलतान' असे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आता तो नवीन अभिनेत्यासोबत नशीब आजमावणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या नव्या चित्रपटाचे शूटिंग ३० मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे. आदित्य चोप्रा यांच्या स्टुडिओमध्ये या सिनेमाचा श्रीगणेशा केला जाईल. मुंबईतील काही महत्त्वाचे सीन चित्रित केल्यानंतर मे महिन्यात या चित्रपटाचे पुढील शेड्यूल तब्बल ६० दिवसांसाठी युनायटेड किंगडममध्ये पार पडणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सराव आणि ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहे.
अली अब्बास जफर यांनी दोन दिवसांपूर्वीच अहानसोबतचा एक खास फोटो पोस्ट केला होता, जो त्यांच्या ट्रेनिंग सेशनमधील आहे. या फोटोला त्यांनी 'शक्ती कोणी देत नाही, ती मिळवावी लागते... अहान पांडे भूमिकेसाठी तयार आहे' असे प्रेरणादायी कॅप्शन दिले आहे. या पोस्टनंतर अहानच्या नव्या लूकबद्दल आणि भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, अहान पांडेने १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'सैय्यारा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अवघ्या ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास घडवला होता. या चित्रपटात अहानसोबत अनीत पड्डाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता अहानचा हा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : After 'Sayyara' success, Ahaan Panday starts filming his next movie directed by Ali Abbas Zafar. Shooting begins in Mumbai, then moves to the UK. The film's cast is training hard, with fans eagerly awaiting Ahaan's new role.
Web Summary : 'सैयारा' की सफलता के बाद, अहान पांडे ने अली अब्बास जफर द्वारा निर्देशित अपनी अगली फिल्म की शूटिंग शुरू की। शूटिंग मुंबई में शुरू होती है, फिर यूके में चली जाती है। फिल्म की कास्ट कड़ी मेहनत कर रही है, प्रशंसक अहान की नई भूमिका का बेसब्री से इंतजार कर रहे हैं।