बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे याचा बॉलिवूड डेब्यू अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहानने एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे तीन सिनेमे साईन केल्याची बातमी सुमारे दोन वर्षांपूर्वी आली होती. अर्थात ही बातमी अफवा निघाली. पण आता एक ताजी बातमी खरी मानाल तर अहानला एक मोठा ब्रेक मिळाला आहे.होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अहान पांडे एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. हा चित्रपट कोणता, तर ‘मर्दानी 2’. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’मधून होणार ‘या’ हँडसम स्टारकिडचा बॉलिवूड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 06:00 IST