Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सैयारा'फेम अहान पांडेच्या पुढील सिनेमाची दिसली पहिली झलक, इंटेन्स लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:45 IST

अहान पांडेच्या दुसऱ्या सिनेमासाठी तरुणाई आतुर

गेल्या वर्षी एका सिनेमाने थिएटर्समध्ये तरुणांना अक्षरश: रडवलं. हा सिनेमा म्हणजे 'सैयारा'. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमात अहान पांडे आणि अनीत पड्डा हे नवोदित कलाकार दिसले. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने, अभिनयाने आणि कथेने तरुणांना प्रेमातच पाडलं. अहान पांडे पहिल्याच सिनेमातून रातोरात स्टार झाला. विशेषत: तरुणी त्याच्यावर फिदा झाल्या. आता त्याच्या पुढील सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अली अब्बास जफरच्या सिनेमात तो दिसणार आहे. नुकतीच सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफरने काही महिन्यांपूर्वी अहान पांडेसोबतचा फोटो पोस्ट करत सिनेमाची घोषणा केली होती. तर आता त्याने अहानचा सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये अहानचा इंटेन्स लूक दिसत आहे. सिनेमाचं शूट नुकतंच सुरु झाल्याचं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यशराज फिल्म्स सिनेमाची निर्मिती करत आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये अहान पांडेचा इंटेन्स लूक, कातील नजरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या सिनेमात अहानसोबत शर्वरी वाघ दिसणार असल्याची चर्चा आहे. तसंच ऐश्वर्य ठाकरे, बॉबी देओलचीही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. हा एक रोमँटिक अॅक्शन सिनेमा आहे. सध्या सिनेमाचं शूट मुंबईत सुरु झालं आहे. तसंच भारताबाहेरही शूटिंग होणार आहे. अद्याप सिनेमाची कहाणी, टायटल याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. अहान पांडेचे चाहते मात्र थेट सिनेमाच्या रिलीज डेटचीच वाट पाहत आहेत. 

अहान पांडेच्या पुढील सिनेमाच्या या पहिल्या लूकवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'सुपर डुपर एक्सायटेड','अहानला वेगळ्या लूकमध्ये पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत','अखेर अहान परत येतोय' असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ahaan Panday's next movie first look revealed, intense look grabs attention.

Web Summary : Ahaan Panday, famed for 'Saiyaara', is set to star in Ali Abbas Zafar's upcoming film. The first look reveals an intense avatar, produced by Yash Raj Films. Sharvari Wagh may also star in the romantic action film.
टॅग्स :अली अब्बास जाफरबॉलिवूड