Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्गंबाई सासूबाई..! ऐश्वर्याबद्दल हे शब्द ऐकताच भडकल्या होत्या जया बच्चन, वाचा हा किस्सा

By तेजल गावडे | Updated: October 13, 2020 16:52 IST

ऐश्वर्या राय बच्चनबद्दल हे शब्द ऐकताच जया बच्चन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती आणि त्यानंतर त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते.

ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यात लोकांना खूप मोठा बदल पहायला मिळतो. लग्नाआधी आणि लग्नाच्या काही कालावधीनंतर जया बच्चन नेहमी आपल्या सूनेची काळजी आणि प्रशंसा करताना दिसत होती. मात्र आता दोघांमध्ये सर्व आलबेल असल्याचे पहायला मिळते. सुरूवातीला त्या दोघी बऱ्याचदा एकत्र स्पॉट व्हायच्या, मात्र आता त्या दोघी फार कमी वेळा एकत्र दिसतात. यामागचे कारण जया बच्चन यांचा वरचढ स्वभाव सांगितला जातो आणि याची झलक पहायला मिळाली होती जेव्हा ऐश्वर्याबद्दल बोलले गेलेल्या एका शब्दामुळे त्यांनी खडेबोल लगावले होते.

खरेतर एकदा बच्चन कुटुंब स्पॉट झाले होते तेव्हा पॅपराझी त्यांचे फोटो काढू लागले. या दरम्यान नेहमी प्रमाणे स्टारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ते सेलिब्रेटींच्या नावाने आवाज देत होते. त्यावेळी काही पॅपराझीने ऐश्वर्याचे नाव घेतले आणि हे ऐकताच जया बच्चन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी तिथे सर्वांनाच खडेबोल सुनवायला सुरूवात केली. जया बच्चन म्हणाल्या की, हे ऐश, ऐश्वर्या काय असते? सासूबाईंना असे नाराज झालेले पाहून ऐश्वर्या खूप अनकंम्फर्टेबल झाली होती. त्यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर येणे टाळले होते. जया बच्चन यांनी रागात दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांनी टीका केली होती. इतकंच नाही तर सोशल मीडियावर बच्चन फॅमिलीला बायकॉट करण्याचाही सल्ला दिला होता.

या घटनेला काही काळ उलटल्यानंतर असे वृत्त समोर आले होते की, ऐश्वर्या रायला सासर सोडून अभिषेक आणि आराध्यासोबत दुसऱ्या घरात शिफ्ट व्हायचे आहे. त्यावेळी असे म्हटले जात होते की जया बच्चन यांचे कंट्रोलिंग नेचर सोबत ऐश्वर्या अॅडजस्ट करू शकत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी देखील माहिती समोर आली होती की, जया बच्चन यांना अपेक्षा होती की त्यांची सून त्यांना प्रोफेशनल लाईफपासून खासगी गोष्टीदेखील शेअर करेल. पण ऐश्वर्याला अजिबात पटत नाही. त्यामुळे त्या दोघींचे आधीसारखे तितके पटत नाही.

मात्र त्यांनी त्यातून काहीतरी मार्ग काढला असेल, असेदेखील म्हटले जाते. त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या घराबाहेर पडण्याचा विचार करत आहेत, ही निव्वळ अफवा ठरली. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनजया बच्चनअभिषेक बच्चन