Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 56व्या वर्षी अभिनेता अनिल मुरलीने घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 17:49 IST

अभिनेता अनिल मुरलीने वयाच्या 56व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

मल्याळम सिनेमाचे दिग्गज अभिनेता अनिल मुरलीने जगाचा निरोप घेतला आहे. त्याने गुरुवारी वयाच्या 56व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याने मल्याळम चित्रपटांशिवाय तमीळ व तेलगू भाषेतील चित्रपटात काम करुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अनिल मुरलीने त्याच्या सिनेकारकीर्दीत जवळपास 200 सिनेमात काम केले आहे. त्याच्या सिनेमामुळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अनिल मुरलीने त्याच्या सिनेकारकीर्दीत जास्त खलनायकाची भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या होत्या. अनिल मुरलीचा जन्म तिरुवनंतपुरममध्ये झाला होता. अनिल मुरलीने आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1993 साली चित्रपट कन्याकुमारीयिल ओरू कविता मधून केली होती. 

पहिल्याच सिनेमातील त्याच्या अभिनय कौशल्याची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर अनिल मुरलीने एकापेक्षा एक दमदार सिनेमात काम केले.