Join us

वयाच्या 44 व्या वर्षीही स्वतःला अशी फिट ठेवते रवीन टंडन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 20:00 IST

रवीना टंडनचे हे वर्कआउट व्हीडीओ तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल हे मात्र नक्की.

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.फिट राहण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. याच यादीत बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडनचेही नाव शामिल झाले आहे. वयाच्या 44 व्या वर्षीही रवीनाने स्वतःला फिट ठेवले आहे. तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. रवीनाने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण म्हणजे रोज न चुकता वर्कआउट आणि जीवनातील काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे फॉलो करते. 

रवीना रोज जवळपास 2 तास वर्कआउट करते. आठवड्यातून 6 दिवस एक्सरसाइज करते, बॅलेंस डायट घेते. वर्कआउट फॉर्म बदलत राहते, कधी ती स्वीमिंगसाठी जाते तर कधी जिममध्ये जाते. कारण वर्कआउट बॉडीसाठी चांगले आहे.तसेच कमीत कमी 45 मिनिटे ट्रेडमिलचा वापर करते. फिट राहण्यासाठी झुंबा डान्सलाही प्राधान्य देते. 

तिच्या सोशल मीडियाव पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला रवीन खूप फिटनेस फ्रिक असल्याचे जाणवेल कारण शेअर केलेल्या व्हीडीओत ती वर्कआऊट, डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय. हे व्हीडीओ पाहून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी वर्कआऊट फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते.सुट्टी असली तरी ती रवीना आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. त्यामुळे रवीनाचे हे वर्कआउट व्हीडीओ तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल हे मात्र नक्की. 

टॅग्स :रवीना टंडन