Join us

अगस्त्य नंदाचं सुहाना खानबरोबर बर्थडे सेलिब्रेशन; बिग बींचा नातू आणि शाहरुखच्या लेकीच्या पुन्हा रंगल्या अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:22 IST

बर्थडे पार्टीतील सुहानाचा अगस्त्यबरोबरचा फोटोही व्हायरल झाला आहे. सुहानाने अगस्त्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा आज वाढदिवस आहे. अगस्त्य नंदा हा बिग बींची लेक श्वेता हिचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून अगस्त्य आणि शाहरुख खानची लेक सुहाना खान हिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं. अगस्त्यच्या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यानही सुहाना दिसून आली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

अगस्त्यच्या बर्थडे सेलिब्रेशनला सुहाना खानही उपस्थित होती. 'द आर्चीज' स्टार मिहीर आहुजाने अगस्त्यच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अगस्त्यच्या बाजूला सुहाना उभी असल्याचं दिसत आहे. या बर्थडे पार्टीतील सुहानाचा अगस्त्यबरोबरचा फोटोही व्हायरल झाला आहे. सुहानाने अगस्त्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.  त्यामुळे पुन्हा एकदा बिग बींचा नातू आणि शाहरुखच्या लेकीच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

अगस्त्य नंदा 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात स्टारकिड्सची फौज पाहायला मिळणार आहे. शाहरुखची लेक सुहाना आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरदेखील याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. जोया अख्तरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ७ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानअमिताभ बच्चन