Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुन्हा ‘कमीने’ नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 22:01 IST

‘कमीने’ने चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. २००९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात शाहीद कपूरच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. ...

‘कमीने’ने चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. २००९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात शाहीद कपूरच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. सिक्वेलच्या काळात ‘कमीने’चाही सिक्वेल येईल, असे अनेकांना वाटले होते. तशी चर्चाही होती. पण आता ‘कमीने’चा सिक्वेल बनणार नाही तो नाहीच. खुद्द दिग्दर्शक व निर्माते विशाल भारद्वाज यांनी तसे स्पष्ट केले आहे. मी ‘कमीने’चा सिक्वल कधीही बनवणार नाही. मला पैसा कमवण्यात अजिबात रस नाही. मी पैसा नाही तर सिनेमे बनवतो. भूमिकेची पुनरावृत्ती मला नकोय. त्यामुळेच ‘कमीने’चा सिक्वेल बनणार नाही, असे विशाल यांनी स्पष्ट केले.