Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा ‘आशिकी २’ मॅजिक ; श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूरने चाहत्यांना दिली ट्रीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 18:51 IST

‘आशिकी २’ चे नाव काढताच डोळयासमोर येते ती चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रसिद्ध पोझ. या ...

‘आशिकी २’ चे नाव काढताच डोळयासमोर येते ती चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रसिद्ध पोझ. या रोमँटिक पोझवर आदित्य-श्रद्धाचे चाहते अक्षरश: फिदा असतात. पण, ही पोझ जर तुम्हाला पुन्हा एकदा पहावयास मिळाली तर काय मजा येईल ना? चाहत्यांचे या पोझवरील प्रेम पाहून ही पोझ त्यांनी ‘ओके जानू’ चित्रपटातही साकारली आहे. नुकतेच चित्रपटाचे एक पोस्टर आऊट करण्यात आले आहे. हे पोस्टर म्हणजे चाहत्यांसाठी नववर्षाची ट्रीट असणार आहे. या पोझच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘आशिकी २’ मॅजिक निर्माण करण्याचा प्रयत्न मेकर्सनी केलाय. ‘आशिकी २’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील गाणी, संवाद आणि पोझ यांच्यामुळे चित्रपटाची चर्चा नेहमीच होते. सध्या ते दोघे शाद अली दिग्दर्शित ‘ओके जानू’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निर्माता करण जोहर याने हे पोस्टर लाँच केले असून या पोस्टरमध्ये ते दोघे पावसात पुन्हा ‘आशिकी २’ मॅजिक निर्माण करायला तयार दिसत आहेत. श्रद्धाने शर्ट आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले असून आदित्य लाल रंगाचे जॅकेट आणि जीन्स या वेशात दिसत आहे. दिग्दर्शक शाद अली यांचा ‘ओके जानू’ हा चित्रपट तमीळ ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’ चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाच्या शूटिंगपासून दिग्दर्शकांनी फोटोंच्या बाबतीत गोपनियता बाळगली होती. चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या हेतूने चित्रपटाची टीम आता पोस्टर्स, न्यू लूक लाँच करत आहेत.}}}}