Join us

दोन वर्षांनंतर सेटवर गेल्यावर दिया मिर्झाची 'ही' होती प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:27 IST

राजकुमार हिरानीच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटाचे नाव अजून ठरवण्यात ...

राजकुमार हिरानीच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटाचे नाव अजून ठरवण्यात आलेले नाही. दोन वर्षानंतर चित्रपटाच्या सेटवर गेल्या मला घाबरल्या सारखे झाले. दियाने आयएएनएसला दिलेल्या इंटव्ह्यु दरम्यान सांगितले. दिया म्हणाली, मला शूटिंग करायला मजा आली. सोबतच मला भीतीसुद्धा वाटली कारण दोन वर्षानंतर मी चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर गेले होते. पहिल्या दिवशीची शूटिंग सकाळी सुरु झाली यावेळी मला खूप घाबरल्या सारख्या झाले. मात्र क्रू मेंबर्सनी मला घरी असल्यासारख्या फिल करुन दिले. त्यानंतर मी रिलैक्स झाले.दिया गेल्या वर्षी आलेल्या सलाम मुंबई चित्रपटात दिसली होती.    संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सोनम कपूर, अनुष्का शर्मा, परेश रावल, मनीषा कोईराला, करिश्मा तन्ना आणि विक्की कौशल झळकणार आहेत. तर या संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारतो आहे. दिया या चित्रपटाला घेऊन खूपच एक्साइटेड आहे.दिया म्हणाली, ''हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मी त्याच्यासोबत याआधी (लगे रहो मुन्ना भाई) ही काम केले आहे. मला या चित्रपट रणबीर कपूरसुद्धा काम करायला मिळणार म्हणून मी खूप उत्साहित आहे. मी या चित्रपटाच्या रिलीजची अजून वाट नाही बघू शकत.'' आधी हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज करण्यात येणार होता. मात्र त्याच दरम्यान सलमान खान स्टारर टायगर जिंदा है रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवरील क्लैशस टाळण्यासाठी हा चित्रपट मार्च 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ALSO READ : ‘चित्रपटात फ्लॉप ठरली म्हणून ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न’; दिया मिर्झावर नेटिझन्सचा हल्लाबोल!दियाने आपल्या करिअरची सुरुवात 2001 मध्ये आलेल्या रहना है तेरे दिल में चित्रपटातून केली होती. चांगली सुरुवात होऊन ही तिला हवं तसं यश मिळवता आले नाही. अभिनयाशिवाय दियाने पत्नी साहिल सिंघासह एक 'बॉर्न फ्री एंटरटेनमेंट’ या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. बॉबी जासूस हा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता.