Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'चा पहिला फोटो केला शेअर; कधी रिलीज होणार?, चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:43 IST

आता सर्वांचे लक्ष अक्षय कुमारच्या पुढच्या चित्रपटाकडे लागले आहे, तो म्हणजे ‘वेलकम टू द जंगल’. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे.

अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. अत्यंत संथ सुरुवात होऊनही या चित्रपटाने पाहता पाहता २५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, अक्षयसाठी या वर्षाची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आता सर्वांचे लक्ष त्याच्या पुढच्या चित्रपटाकडे लागले आहे, तो म्हणजे ‘वेलकम टू द जंगल’. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे.

अक्षय कुमारचा 'धडाकेबाज' लूक

नुकतंच अक्षय कुमारने 'X' वर आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रेड कार्पेटवर अतिशय स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे. पँट-कोट घातलेला अक्षय यामध्ये अतिशय हँडसम दिसत असून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "नेक्स्ट... वेलकम टू द जंगल". अक्षयच्या या लूकने चाहत्यांची उत्सुकता वाढवली असली तरी काही लोक मात्र गोंधळात पडले आहेत. एकूणच अक्षयच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून अक्षयचा हा खास लूक सर्वांना आवडल्याचं दिसतंय.

'वेलकम' मालिकेचा प्रवास

अक्षय कुमारचा हा चित्रपट 'वेलकम' सिरीजचा तिसरा भाग आहे. 'वेलकम'च्या पहिल्या भागात अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि कतरिना कैफ होते. तर दुसऱ्या भाागात 'वेलकम बॅक'मध्ये जॉन अब्राहम, श्रुती हासन, नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसले होते. आता तिसऱ्या भागात अर्थात 'वेलकम टू द जंगल' मध्ये कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.

मेकर्स या आठवड्यात एखादे पोस्टर किंवा गाणे लवकरच प्रदर्शित करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. जूनमध्ये इतरही अनेक मोठे चित्रपट येणार असल्याने ‘वेलकम टू द जंगल’ची टक्कर कोणासोबत होणार हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे. २६ जून रोजी ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमारसेलिब्रिटी