पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चित्रांगदा सिंग या कारणामुळे राहतेय बॉबी देओलच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:39 IST
‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या चित्रांगदा सिंगने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर ...
पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चित्रांगदा सिंग या कारणामुळे राहतेय बॉबी देओलच्या घरी
‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या चित्रांगदा सिंगने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. आपले सौंदर्य, संवेदनशील अभिनयकला आणि नृत्यकौशल्याने तिने रसिक प्रेक्षकांवर आपली मोहिनी घातली आहे. चित्रांगदाने ‘सॉरी भाई’,‘देसी बॉयज’,‘ये साली जिंदगी’,‘गब्बर इज बॅक’ आदी चित्रपटांत काम केले आहे. चित्रांगदा सिंह गत सहा- सात वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. २०११ मध्ये ‘देसी बॉयज’मध्ये ती अखेरची दिसली होती. त्यानंतर ‘गब्बर इज बॅक’मध्ये एक आयटम साँग करताना ती दिसली. यादरम्यान ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातून चित्रांगदा कमबॅक करणार, अशी चर्चा रंगली होती. पण निर्मात्यासोबत मतभेद निर्माण झाल्याने चित्रांगदाने ऐनवेळी या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले होते. चित्रांगदा सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. २००१ मध्ये तिचे लग्न गोल्फर ज्योती रंधावासोबत झाले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. पण अचानक २०१४ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. चित्रांगदाने नुकतेच ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. चित्रागंदा सध्या अभिनयक्षेत्रापासून ब्रेक घेऊन निवांत वेळ घालवत आहे. ती सध्या श्रीनगरमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. श्रीनगरमध्ये तिच्यासोबत तिच्या कुटुंबीयातील मंडळी आणि तिचे जवळचे मित्रमैत्रीण आहेत. चित्रागंदा नवऱ्यापासून वेगळी झाल्यापासून एकटीच राहात आहे. ती सध्या कुठे राहात आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. अभिनेता बॉबी देओलने रिअल इस्टेटमध्ये चांगलाच पैसा गुंतवला असून त्याचे अनेक फ्लॅट्स आहेत. त्याच्याच एका फ्लॅटमध्ये सध्या चित्रांगदा भाड्याने राहात आहे. Also Read : ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये ‘लुंगी डान्स’च्या तालावर थिरकणार चित्रांगदा सिंह!