सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या नावाने बाजारात गोंडस बाहुल्या आल्या होत्या. त्यानंतर आता एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात दाखल झाली आहे. हे जोडपे कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल ना.हे जोडपे दीपवीर नसून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आहे. निळ्या सूटमध्ये निक जोनस आणि पिवळ्या बॉर्डरच्या साडीमध्ये प्रियांका चोप्रा अशी ही बाहुली आहे. ही बाहुली मातीची असून जोधपूरच्या एका कलाकाराने तयार केली आहे.
गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.