Join us

कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर संजय दत्तनं आधी शूट केला KGF 2चा क्लायमॅक्स, म्हणाला- 'मी कधीही ...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:00 IST

साउथचा स्टार यश(Yash)चा आगामी चित्रपट 'केजीएफ २' (KGF 2)ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट उद्या (१४ एप्रिल) रिलीज होत आहे.

साउथचा स्टार यश (Yash)चा आगामी चित्रपट 'केजीएफ २'(KGF 2)ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट उद्या (१४ एप्रिल) रिलीज होत आहे. या चित्रपटातील संजय दत्त(Sanjay Dutt)ने साकारलेल्या अधिरा या पात्राचीदेखील सर्वत्र खूप चर्चा झाली. कारण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कोरोना भारतात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचवेळी अभिनेता संजय दत्तला कर्करोग झाल्याचे समोर आले होते. तथापि, हे देखील खरे आहे की कर्करोगातून बरे झाल्यानंतर संजयने सर्वात आधी केजीएफ २ चे शूटिंग सुरू केले आणि तेही त्याच्या क्लायमॅक्सच्या सीनने. अशा परिस्थितीत हे करणे किती कठीण होते, यावर खुद्द संजय दत्तनेच आता प्रकाश टाकला आहे.

संजय दत्त म्हणाला की, होय, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होते. माझ्यावर उपचार सुरू होते, केमोचे सत्र सुरू होते आणि जेव्हा मी क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केले तेव्हा देखील ते सुरूच होते. त्यातून सुटका नव्हती. तुम्हाला ते करावेच लागते जे तुम्हाला करायचे आहे. मात्र जेव्हा तुमच्या जीवनात रॉक-सॉलिड सपोर्ट सिस्टीम असेल तेव्हा ते करणे सोपे होते. माझ्या कुटुंबाची ताकद आणि उत्कटतेच्या जबाबदारीने मला अभिनयात परत आणण्यासाठी मला मानसिकदृष्ट्या धैर्यवान आणि उत्साही ठेवले. मी 'कधीही हार मानू नका' या ब्रीदवाक्यासोबत वाढलो आहे. देव दयाळू आहे, आज मी कर्करोगमुक्त आहे आणि नॉर्मल आयुष्य जगतो आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयच्या तब्येतीला लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सनी संजय दत्तला बॉडी डबलची मदत घेण्याचा सल्ला दिला, पण संजयने बॉडी डबलशिवाय संपूर्ण सीन स्वत: शूट केला. याविषयी संजय दत्त म्हणतो, "त्यांनी ग्रीन पडद्यावर चित्रीकरण करावं असं सुचवलं होतं. पण एक अभिनेता म्हणून या चित्रपटाचं अचूक शूटिंग करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." 

टॅग्स :संजय दत्तकेजीएफयश