Join us  

निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 3:15 PM

Priyanka chopra: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.

ठळक मुद्देप्रियांकाने पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा Priyanka Chopra हीने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यानंतर प्रियांकाने पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. त्यामुळे सध्या अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका ‘द एक्टिव‍िस्‍ट’ The Activist या तिच्या शोमुळे चर्चेत येत आहे.  अलिकडेच या शोचा प्रिमियर सोहळा पार पडला तेव्हापासून या ग्लोबल सिटीजन शोची चर्चा रंगू लागली आहे. अनेकांनी या शोमुळे प्रियांकाला ट्रोलही केलं आहे. त्यामुळेच शोच्या फॉमॅटमुळे ट्रोल झालेल्या प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. मी या कार्यक्रमाचा भाग झाल्यामुळे जर तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते, असं प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

"गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवाजाची ताकद पाहून मी खरंच थक्क झाले आहे.  ज्यावेळी लोक एकत्र येऊन एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवतात. त्यावेळी त्यांचं कायम ऐकलं जातं. तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. शोने या सगळ्याला चुकीच्या पद्धतीने हाताळलं. मी या शोचा भाग झाल्यामुळे काही जण नाराज झालेत यासाठी मी मनापासून माफी मागते. या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य जगापुढे यावं, त्यांच्या कार्याचा सत्कार व्हावा यासाठीच आम्ही या शोचं आयोजन केलं होतं. या नव्या शोमुळे सामाजिक कार्यकर्त्यांचं काम जगासमोर येईल याचा मला आनंद होता. त्यामुळेच मी याचा भाग झाले होते", असं प्रियांका म्हणाली. 

पुढे ती म्हणते,  "जागतिक स्तरावर काम करणारे अनेत सामाजिक कार्यकर्ते आहेत. जगात बदल घडवून आणण्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. मात्र, त्यांचं काम जगासमोर येत नाही. त्यामुळेच केवळ त्यांची ओळखच निर्माण होऊ नये. तर ओळखीसोबत त्यांच्या कामाचा पुरस्कारही केला पाहिजे."

काय आहे ‘The Activist’ चा वाद ?

ग्लोबल सिटीजन 'द एक्टिविस्ट' या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या ६ समाजसेवकांमध्ये एक स्पर्धा घेतली जाणार आहे. यात एक्टिविस्टला ऑनलाइन एंगेजमेंट, सोशल मीट्रिक आणि होस्टचे इनपुट्स यांच्या आधारावर त्यांची गुणवत्ता ठरवली जाईल. यात विजयी ठरलेल्या उमेदवाराला बक्षिसाची ठराविक रक्कम आणि G20 शिखर संम्मेलनात सहभागी होण्याची संधी मिळेल. परंतु, या कार्यक्रमाचा फॉमॅट पाहून अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अशी स्पर्धा करणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडहॉलिवूड