Join us

ड्रामा क्वीन राखी सावंत एकटीच जाणार हनीमूनला, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:03 IST

स्वत:चे रोज डझनावर फोटो पोस्ट करणा-या राखीने नव-याचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. आता अशात राखीने एक नवा ड्रामा सुरु केला आहे.

ठळक मुद्दे राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. आधी लग्नाची बातमी तिने नाकारली आणि नंतर होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली.

ड्रामा क्चीन राखी सावंतचे लग्न खरेच झाले की नाही, हे कळायला मार्ग नाही. याचे कारण म्हणजे, राखीच्या नव-याचा एकही फोटो अद्यापही समोर आलेला नाही. स्वत:चे रोज डझनावर फोटो पोस्ट करणा-या राखीने नव-याचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. आता अशात राखीने एक नवा ड्रामा सुरु केला आहे. होय, राखीने एकटीने हनीमूनला जाण्याचा प्लान केला आहे.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत राखीने ही माहिती दिली. मी एकटी लंडनला हनीमूनला जातेय. ‘मी खूप आनंदी आहे की, पुढच्या आठवड्यात मी लंडन, बर्मिंघम अशा अनेक ठिकाणी जात आहे. मी हनीमूनला जातेय. पण यावेळी मी एकटी असेल...,’ असे ती या व्हिडीओत म्हणतेय. हनीमूनवर एकटी जाण्याचे कारणही तिने सांगितले आहे. ‘मी कंगना राणौतचा क्वीन हा सिनेमा पाहिला होता. त्यामुळे मी सुद्धा एकटी हनीमूनला जातये. मज्जा येईल...,’ असे ती म्हणतेय.

साहजिकच एकटीने हनीमूनला जाण्याचा राखीचा हा नवा ड्रामा लोकांना कन्फ्युज करतोय. राखीचे खरचं लग्न झाले की तोही एक ड्रामाच आहे, हे कळायला मार्ग नाही. पण एक मात्र खरे की, या सगळ्यामुळे राखीला  जोरदार पब्लिसिटी मिळतेय.

 राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. आधी लग्नाची बातमी तिने नाकारली आणि नंतर होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली. तिच्या पतीचे नाव रितेश आहे, हेही तिने सांगितले. गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते. 

टॅग्स :राखी सावंत