Join us

हिमेश रेशमिया पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, सोनिया कपूरसोबत केले दुसरे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:04 IST

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. सोनम कपूर आणि नेहा धुपियानंतर गायक हिमेश रेशमियाने देखील लग्न केले आहे. होय, ...

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. सोनम कपूर आणि नेहा धुपियानंतर गायक हिमेश रेशमियाने देखील लग्न केले आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात हिमेशने आपली गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्न केले आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार हिमेशने सोनियासोबत कोर्ट मॅरेज केले आहे.   दोन दिवस आधी हिमेश आणि सोनियाची मेहंदीची सेरेमनी पार पडली. ज्यानंतर दोघांनी आज लग्न केले आहे. आज हिमेशच्या लग्नाचे रिसेप्शन आहे ज्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी होणार आहे. हिमेशने सोनियासोबतचे नातं कधीच खुलेआम स्वीकारले नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी दोघे एकत्र स्पॉट झाले होते. हिमेशचे हे दुसरं लग्न आहे. हिमेशने त्याची पहिली पत्नी कोमलसोबत 22 वर्षानंतर घटस्फोट घेतला. हिमेश आणि कोमलला स्वयम नावाचा मुलगादेखील आहे. हिमेश आणि कोमलच्या घटस्फोटाला सोनिया कारणीभूत असल्याची चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हिमेश सोनियासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, आज अखेर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. सर्वप्रथम २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच सांगितली. परंतु दोघांची वाढती सलगी मीडियापासून  लपून राहिली नाही. कुटुंबियांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडीलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सुत्रांनुसार, कोमलला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही.काही दिवसांपूर्वी हिमेश सारेगमपा या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत दिसला होता. हिमेशने करिअरची सुरुवात सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून केली होती. 2003 मध्ये हिमेश तेरे नाम चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे प्रकाश झोतात आला. आशिक चित्रपटातून त्यांने गायला सुरुवात केली.