Join us

'पद्मावती'च्या फर्स्ट लुकनंतर दीपिका पादुकोणचे आणखीन काही फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:03 IST

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट 'पद्मावती'मधला दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी  सूर्योदय होतानाचा राणी ...

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट 'पद्मावती'मधला दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी  सूर्योदय होतानाचा राणी पद्मावतीच्या लूकमध्ये दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या समोर आली. दीपिका या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तिचा शाही अंदाज काळजाचा ठोका चुकवणार आहे. याच बरोबर दीपिकाचा आणखी एक लुक लाँच केला आहे त्यात दीपिका दागिन्यांनी मढलेली दिसत आहे. पहिल्या लाँच झालेल्या लुकशी मिळताजुळता असा हा दुसरा लुक ही आहे पण यात तिने परिधान केलेले दागिने हे वेगळ्या स्टाईलचे आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण महाराणी पद्मावतीची भूमिका करत असून नवरात्रीच्या दिवशी या  चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले ह्या मागचे कारण विचारले असता "राणी पद्मावती भारतीय संस्कृती आदर करते म्हणून हा निर्णय घेण्यात आला". दीपिकाने या लुकसाठी भरपूर मेहनत घेतली आहे, दीपिका या अंदाजत ऐवढी सुंदर दिसत आहे तेवढाच कमी वेळ तिने या भूमिकेसाठी तयार व्हायला घेतला. ती फक्त अर्धा तासात तयार व्हायची ती आपल्या चेहऱ्यावर फार कमी मेकअप करायची.दीपिकाशिवाय यात चित्रपटात शाहिद कपूर सुद्धा आहे. जो यात  राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंगअल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १ डिसेंबर २०१७ रोजी येणार आहे. हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जयपूरमध्ये करणी सेनेने विरोधात करत सेटवर धिंगाण घातला होता. त्यामुळे शूटिंग सुरु व्हायला उशीर झाल्याने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर रणवीर सिंगला राजपूत करणी सेनेने अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पद्मावती’त तथ्यांना जराही विकृत केले गेले तर आम्ही या चित्रपटाचे स्क्रिनिंग हाणून पाडू, असा इशाराही करणी सेनेने दिला आहे. ALSO RAED : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राणी पद्मावतीबनत दीपिका पादुकोणचे झाले आगमन !