पंधरा वर्षांनंतर परतणार अरविंद स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 20:09 IST
‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ हे दोन चित्रपट आठवतात..तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला. तर ऐका, या दोन चित्रपटाद्वारे आपली वेगळी ...
पंधरा वर्षांनंतर परतणार अरविंद स्वामी
‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ हे दोन चित्रपट आठवतात..तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला. तर ऐका, या दोन चित्रपटाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता अरविंद स्वामी तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरील एन्टीसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक तनुज भ्रामार याच्या ‘डियर डॅड’ या चित्रपटात अरविंद स्वामी पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. खुद्द अरविंद स्वामी मोठ्या पडद्यावरील या वापसीमुळे जाम खूश आहे. चित्रपटाची स्क्रीप्ट मला आवडली आणि मी या भूमिकेसाठी होकार दिला, असे त्याने सांगितले. ‘डियर डॅड’ हा चित्रपट एक १४ वर्षांचा मुलगा शिवम व त्याचे वडील स्वामीनाथन यांची कथ आहे. हे दोघेही एका मोठ्या ट्रिपला निघतात, यादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवांची ही कहानी आहे.